देऊळगाव राजा बायपासवर बस आणि ट्रकचा भीषण अपघात; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, 18 प्रवासी जखमी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बायपास मार्गावर भीषण अपघात झाला आहे. यवतमाळ बस डेपोची एक बस आज सकाळी औरंगाबादकडे निघाली होती. दरम्यान, देऊळगाव राजा बायपास मार्गावर दुपारी 1 वाजता ट्रक आणि बसमध्ये धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 18 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींवर देऊळगाव राजा येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार सुरु आहे. बसचा या अपघात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बसमध्ये अपघाताच्या वेळी 25 प्रवाशी प्रवास करत होते.
अनेक प्रवाशी गंभीर जखमी
देऊळराजा बायपास मार्गावरील या अपघातात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, यामध्ये एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी लोकांना तातडीने जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहे. अपघाताचा आवाज येताच स्थानिक गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, स्थानिक गावकऱ्यांनी बचाव कार्य सुरु करत अनेक लोकांना बसमधून बाहेर काढले. दरम्यान, काही लोकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला दिली.
3 दिवसांपूर्वीच घडला मोठा अपघात, 13 मजूर ठार
बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळील तढेगावमध्ये तीन दिवसांपूर्वीच मोठा अपघात झाला होता. सिंदखेडराजा- मेहकर महामार्गावरील तढेगाव फाट्यावर हा भीषण अपघात घडला होता. या अपघातात समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या 13 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 3 लोक गंभीर जखमी झाले होते. मजुरांना घेऊन जाणारे ट्रक तढेगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उटल्याने हा अपघात घडला होता.