मोदी सरकारची लसीकरणासाठी मोठी मोहीम; ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान २१७ कोटी लसींचे डोस होणार उपलब्ध
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : देशामध्ये करोनाच्या लसींचा तुटवडा जाणवत असतानाच एक साकारात्मक बातमी समोर आली आहे. कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर विनोद कुमार पॉल यांनी लसीकरणासाठी लवकरच भारताकडे पुरेश्याप्रमाणात लसी उपलब्ध असतील असं म्हटलं आहे. गुरुवारी पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान २१७ कोटी लसींचे डोस लसीकरणासाठी उपलब्ध असतील. २०२२ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत ३०० कोटी डोस उपलब्ध असतील असं पॉल यांनी म्हटलं आहे. हा फारच महत्वकांशी आहे असं तुम्ही म्हणाल तर तसं असू शकतं. हे पूर्ण होणार नाही असंही म्हटलं जाईल. पण यासंदर्भातील सर्व तयारी सुरु करण्यात आली आहे, असं पॉल यांनी सांगितलं. देशातील लसीकरणाच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने टास्क फोर्सच्या मदतीने जास्तीत जास्त लसी भारतात आणण्याचा प्रयत्न आहे. मोठ्याप्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्याची सरकारची योजना तयार केल्याचे संकेत पॉल यांनी दिलेत.
“ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतीयांसाठी २१७ कोटी लसींचे डोस निर्माण केले जाणार आहेत. जसे जसे आपण लोकांचं लसीकरण करत जाणार त्याप्रमाणे लसी उपलब्ध होण्याचं प्रमाण वाढणार यात काहीच शंका नाही, असंही डॉक्टर पॉल यांनी सांगितलं आहे. गुरुवारी सकाळपर्यंत २५ लाख ७० हजाप ५३७ टप्प्यांमध्ये एकणू १७.७२ कोटी भारतीयांना करोनाची लस देण्यात आलीय.