मुंबई गोवा महामार्गावर अपघात
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सिंधुदुर्ग : ओरोस येथे पावलो ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन झालेल्या अपघातात पायी चालत जाणारे दूध व्यवसायिक मंगेश महादेव सावंत (वय ४६) रा.सावंतवाडा हे जागीच ठार झाले. तर गाडीतून प्रवास करणारे दोघे गंभीर जखमी झाल्या तर अन्य काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.हा अपघात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भवानी मंदिर मुंबई-गोवा महामार्गावर घडला. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. शोभा रवि वाघेला रा.म्हापसा व सोपान आशिष दुबे रा.अंधेरी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती पोलीस ठाण्याचे हवालदार गुरुदास पाडवे यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की,गोवा येथून ही बस मुंबईच्या दिशेने जात होते. ओरोस येथे आली असता रस्त्यावर पावसाचे पाणी असल्यामुळे चालकाचा ताबा सुटला,व बस पलटी होऊन पुन्हा गोव्याच्या दिशेने उलटी कोसळली. यावेळी त्या ठिकाणी दूध पोचण्यासाठी चालत जात असलेले मंगेश सावंत हे त्या बस खाली चिरडले गेले. अपघाताचा आवाज येताच त्या ठिकाणी धाव घेतली, त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.