जेईई-मेनच्या चौथ्या सत्राचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून अथर्व तांबट टॉप १८ मध्ये

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जेईई-मेनच्या चौथ्या सत्राचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून अथर्व तांबट टॉप १८ मध्ये

नवी दिल्ली : इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा जेईई-मेनच्या चौथ्या सत्राचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. या परीक्षेत एकूण ४४ उमेदवारांना १०० टक्के गुण मिळाले असून १८ उमेदवारांनी टॉप रँक मिळवला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी अधिकृत माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांना आपली गुणसंख्या सुधारण्याची संधी मिळावी, यासाठी यावर्षी जेईई-मेनची परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले सत्र फेब्रुवारी, दुसरे मार्च महिन्यात नियोजित करण्यात आले होते. पुढील सत्राच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होत्या. मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने त्या स्थगित करण्यात आल्या होता. तिसरे सत्र २०-२५ जुलैला आणि चौथे सत्र २६ ऑगस्टपासून २ डिसेंबरपर्यंत आयोजित होते.

असा पहा निकाल –
१. अधिकृत वेसबाईट jeemain.nta.nic.in किंवा ntaresults.nic.in ओपन करा
२. होम पेजवर ‘JEE Main 2021 session 4 results’ लिंकवर क्लि करा
३. तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सेक्यूरिट कोड भरा
४. माहिती भरल्यानंतर सबमिट करा
५. चौथ्या सत्रासाठी जेईई मेनचा निकाल समोर येईल
६. तुमचा निकाल डाऊनलोड करा आणि पुढील गोष्टींसाठी त्याची प्रिंट आऊट घ्या
२३ आयआयटीमध्ये बीटेक आणि युजी इंजिनिअरिंग प्रोग्राम कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षा ३ ऑक्टोबरला घेतली जाणार आहे.
यावर्षी ९.३४ लाख उमेदवारांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७७ टक्के उमेदवारांनी दुसर्यांदा परिक्षा दिली. ६० टक्के विद्यार्थी असे आहेत ज्यांनी स्कोअर वाढवण्यासाठी तीन वेळा परिक्षा दिली. प्रत्यक्षात ७ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या १८ जणांनी रँक एक मिळवली. त्यात महाराष्ट्रातून अथर्व तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्रप्रदेशचे सर्वाधिक चार, राजस्थान तीन, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी दोन विद्यार्थी टॉप १८ मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक सहा विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.

या साईटवर निकाल बघता येईल - nta.ac.in, ntaresults.nic.in, jeemain.nta.nic.in

जेईई मेन पेपर एक आणि दोनच्या निकालाच्या आधारावर टॉपचे दोन लाख ४५ हजार विद्यार्थी हे जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र झालेले आहेत. या एकमेव परिक्षेतूनच देशातल्या प्रमुख अशा २३ आयआयटीत प्रवेश मिळेल. जेईई अॅडव्हान्सची परिक्षा ही ३ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. जेईई मेन निकाल जारी झाल्यानंतर लगेचच जेईई अॅडव्हान्ससाठी नोंदणी सुरू झाली आहे. टॉपचे दोन लाख ५० हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र आहेत. उमेदवार jeeadv.ac.in वर जाऊन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.