केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न दुर्दैवी : पिनराई विजयन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
तिरुअनंतपुरम : सामाज माध्यमांवर केरळच्या कोरोना विषयक अभियानावर प्रसारित कथित खोट्या वार्ता आणि माहितीवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त केली.
या संदर्भात ट्वीटर द्वारे आपले मत मांडताना पिनराई विजयन म्हणाले, " साथरोगाच्या काळात केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. त्यापैकी एक म्हणजे खोट्या वार्ता, मोबदल्याचा मुद्दा काढत श्रमिकांना लसीच्या मात्रा वाहनातून उतरविण्यास रोखले गेले असा प्रचार केला जातो आहे. संकट काळातही निस्वार्थ भावनेने श्रमिक समाजाची सेवा करीत आहेत. त्यांना आम्ही सलाम करतो असे विजयन यांनी सांगितले.
संचारबंदीत भोजनदान
संचारबंदीत कोणताही नागरिक अन्नाशिवाय राहू नये यासाठी राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली. या संदर्भात ट्वीटर द्वारे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, " संचारबंदीत कोणीच भुकेला राहणार नाही. पुढील आठवड्यापासून अतिथी श्रमिकांना आणि परिवारास विनामूल्य भोजन संचांचे वितरण केले जाईल. गरजू नागरिकांना भोजन नागरी भोजनालय आणि सामुदायिक उपहारगृहात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत प्रदान करण्यात येईल. " कोरोना संकट आणि संसर्गाची वाढती तीव्रता आणि प्रसार लक्षात घेत राज्य सरकाने 8 -16 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे सकाळी 6 वाजतापासून 16 मे पर्यंत संपूर्ण केरळ राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या आणि बलवान लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.