उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी घटनेचे पडसाद सोलापुरातही उमटले
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सोलापूर : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथील घटनेचे पडसाद सोलापुरातही उमटले. सीटूने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पूनम गेटवर ठिय्या ठाेकला तर शहर युवक काँग्रेसने रात्री डाॅ. आंबेडकर चौक येथे मेणबत्त्या प्रज्वलित करून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. सत्तेच्या धुंदीत असलेल्या मोदी, योगी भाजप सरकारकडून हुकूमशाही सुरू असून, अन्नदात्या शेतकऱ्यांचा आवाज चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाकेली डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली.