आशा बुचकेंचा भाजपात प्रवेश
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पुण्यात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. १५ वर्ष शिवसैनिक राहिलेल्या आशा बुचके यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचकेंचा पक्षप्रवेश झाला. भाजपचा पुणे जिल्ह्यात शिवसेनेला हा जोरदार झटका मानला जात आहे.
आशा बुचके यांनी १५ वर्ष शिवसेनेचे काम केले. महिलांचे मोठं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शिवसेनेने जुन्नर तालुक्यात मोठा राजकीय बदल केला होता. शिवसेनेकडून बुचके यांची हकालपट्टी करण्यात आली होती, दरम्यान आशा बुचके यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
मला परकियांनी पराजित केलं नाही…
आशा बुचके म्हणाल्या, “शिवसेनेत असतांना कार्यकर्ता केंद्रबिंदू माणून मी काम केलं. प्रत्येक निवडणूक माझी निवडणूक म्हणून काम केलं. माझा सरपंच झाला पाहिजे, माझा सद्स्य झाला पाहिजे, या भावणेतून काम केले. भाजपा माझा पिंड असल्यामुळे संघटना आणि संघटनात्मक काम हे रक्तातचं होतं. ते घेऊन कार्यकर्त्याला मोठं करत असतांना तो सदस्य तरी व्हावा, यासाठी वर्षाचे बारा महीने कष्ट केले. आणि जुन्नर नगरपरिषदेची निवडणूक काबीज केली. तसेच पंचायत समितीवर भगवा फडकवून जिल्हा परिषदेत पाच सदस्य नेत न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली. पक्ष निष्ठता कधीही सोडली नाही. मी कार्यकर्त्यांच्या जोरावर ७ निवडणूका लढले. परंतु मला परकियांनी पराजित केलं नाही. मला स्वकीयांनीच पराजित केलं”, असा आरोप यावेळी आशा बुचके यांनी केला.
“विधानसभा निवडणूक हारली तरी देखील दुसऱ्या दिवशी लोकांचे आभार मानले, हे फक्त कार्यकर्यांच्या जोरावर करता आले. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्ता असतो तोच खरा नेता होऊ शकतो. हे समीकरण कायम जुडवण्याचं काम मी केलं. पक्षाचा (शिवसेना) विश्वास मी विसरु शकत नाही. पण न्याय देत असतांना ज्यावेळी माझ्यासारख्या महिलेची काहींच्या सांगण्याने पक्षातून हकालपट्टी होते. मात्र या संकटात कार्यकर्त्यांनी माझी पाठ सोडली नाही”, असे आशा बुचके म्हणाल्या.