सुजय डहाकेने केली ‘श्यामची आई’ चित्रपटाची घोषणा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे एका पेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणारा तरुण दिग्दर्शक सुजय डहाके सिनेमांच्या हटके कथानकांमुळे कायम चर्चेत राहिला आहे. यानंतर सुजय आता पुन्हा एकदा वेगळ्या विषयावरील चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीच स्वत:समोर वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट बनवण्याची आव्हानं उभी करत ती यशस्वीपणे पार करणारा सुजय आता इतिहासाची पानं उलगडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
स्वातंत्र्यदिनाचं औचुत्य साधत सुजयने त्याच्या नव्या सिनेमाचं पोस्टर शेअर करत या नव्य सिनेमाची घोषणा केलीय. सुजयनं ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे.
अमृता अरूण राव यांची निर्मिती असलेला ‘श्यामची आई’ हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित असेल. यंदाचं वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीचं आहे. याच पुण्यपर्वाचं औचित्य साधत ‘श्यामची आई’ हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय सुजयनं घेतला आहे.