राहुल-प्रियंकांना भेटल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात प्रशांत किशोर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर मंगळवारी दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले. तेव्हा देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. या बैठकीला प्रियंका गांधी आणि पंजाब कॉंग्रेसचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात असे म्हटले होते की हे प्रकरण पंजाबमधील नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांच्यात सुरू असलेल्या भांडणाशी संबंधित आहे. पण आता समोर येतेय की, प्रशांत किशोर म्हणजे PK कॉंग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात. काँग्रेसची प्लानिंग आहे की, पीके यांनी राष्ट्रीय स्तरावर काँग्रेससाठी महत्त्वाची भूमिका बजवावी.
पीकेसोबतच्या बैठकीत फक्त राहुल-प्रियंकाच नव्हे तर सोनियासुद्धा उपस्थित होत्या
न्यूज पोर्टल एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये सामील होत असल्याचे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत केवळ राहुल आणि प्रियंकाच नव्हे तर सोनिया गांधीही उपस्थित होत्या. ही बैठक पंजाबमधील लढाई किंवा पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकांबद्दल नव्हती, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकांविषयी होती.
या बैठकीत कॉंग्रेसने काही मोठ्या योजना केल्या आखल्याचेही सूत्रांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका पक्षाला हवी आहे जेणेकरून पीके कॉंग्रेसला या निर्णायक लढाईसाठी तयार करु शकतील.
पीके म्हणाले - मी जे करत आहे, आता ते करायची इच्छा नाही
या बैठकीसंदर्भात प्रशांत किशोर म्हणाले की, आता जे करतोय, पुढे ते करायचे नाही. त्यांना हे ठिकाण सोडायचे आहे. ते म्हणाले की त्यांना आपल्या आयुष्यात ब्रेक घ्यायचा आहे आणि काहीतरी वेगळे करायचे आहे.