राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेते संचारी विजय (sanchari vijay accident) यांचं अपघातात निधन झालं आहे. संचारी विजय (sanchari vijay) हे राष्ट्रीय अवार्ड्स (National Award) विजेते होते. दुचाकीवरून जात असताना त्यांचा अपघात झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली. डोक्याला त्याच्या गंभीर मार लागल्याने त्याच्या मेंदूला जखम झाली होती. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता पण विजय हे तत्पूर्वी कोमात गेले होते. त्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते संचारी विजय (sanchari vijay) यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अभिनेते संचारी विजय (sanchari vijay) यांना दुचाकीवरून (bayik) प्रवास करायला आवडत होतं. शनिवारी पाऊस पडल्यामुले रस्ते ओले आणि गुळगुळीत झाले होते. विजय (sanchari vijay) बाईक घेऊन जाताना रस्त्यावरून बाईक स्लिप झाली. आणि विजय खाली कोसळला. त्याच्या डोक्याला जब्बर मार लागला. यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळं डोक्यातून अधिक प्रमाणात रक्त वाहून गेलं. तेव्हा ते कोमात गेले. डॉक्तरांनी अथक प्रयत्न केलेत. मात्र, त्यांचं शरीर या उपचारांना साथ देईना. त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
-
अभिनेते संचारी विजय (sanchari vijay) यांचे कुटूंबीय हे विजय यांचे अवयव दान करणार आहेत. या अवयवांच्या माध्यमातून विजय आपल्यात कायम जिवंत राहतील अशी भावूक प्रतिक्रिया विजय यांचे मोठे भाऊ सिद्धेश कुमार यांनी दिली आहे. कोरोना (corona) काळात विजय यांनी लोकांच्या मदतीसाठीही हात पुढे केला होता. यूसायर या टीमशी जोडून घेत ते कोरोना बाधित नागरिकांना प्राणवायू पुरवण्याचं काम करत होते. दरम्यान, संचारी विजय यांना अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.