या महिन्यातल्या सगळ्या ऑफलाईन परीक्षा पुढे ढकला- शिक्षण मंत्रालयाचा आदेश
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली: शिक्षण मंत्रालयाने आज एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. मंत्रालयाने सर्व केंद्रिय अनुदान प्राप्त शिक्षण संस्थांना या महिन्यातल्या सर्व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश दिला आहे. देशातली करोनाची दुसरी लाट लक्षात घेता हा आदेश देण्यात आला आहे. मात्र, ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. त्याच्यात अद्याप तरी बदल होणार नाही. दिल्ली विद्यापीठासह अनेक शिक्षण संस्थांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दिल्ली विद्यापीठाचे डीन दिवान रावत यांनी म्हटलं आहे की, सर्व कुलगुरु आणि डीन यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी हेही सांगितलं की देशातली करोनाची स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
या परीक्षा आता जूनमध्ये घेण्यात येतील.
दरम्यान, आज वैद्यकीय क्षेत्रासाठीची नीट(NEET) ही परीक्षा चार महिने पुढे ढकलण्यात आली आहे.