मुंबईत एक कोटींच्या काश्मिरी चरससह महिला ड्रग्स पेडलरला अटक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : नागपाडा भागात अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत दोन किलो काश्मिरी चरससोबत एका महिला ड्रग्स पेडलरलाही अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत एक कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) सहसंचालक समीर वानखेडे यांनी उपरोक्त माहिती दिली.
अधिक चौकशीत या अंमली पदार्थाचे धागेदोरे थेट जम्मू-काश्मीरपर्यंत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात माहिती देताना वानखेडे यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधून नागपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात चरस आणल्याची माहिती मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्याआधारे मुंबई अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या पथकाने रविवारी रात्री नागपाडा भागात छापा टाकला. या छाप्यात दोन किलो काश्मिरी चरस जप्त केले, ज्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या कारवाईत एक महिला ड्रग्स पेडलरला अटक केली असून तिची कसून चौकशी केली जात आहे.