फ्रान्सने कोरोना संकटात तत्परतेने केलेल्या मदतीसाठी धन्यवाद : पंतप्रधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

फ्रान्सने कोरोना संकटात तत्परतेने केलेल्या मदतीसाठी धन्यवाद : पंतप्रधान

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संदर्भात ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " माझे प्रिय मित्र फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी संवाद साधला. तत्परतेने  फ्रान्सने कोरोना संकटात केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले.आम्ही द्विपक्षीयक्षेत्रीय आणि जागतिक विषयांवर चर्चा केली. यासोबत भारत-प्रशांत क्षेत्र आणि पर्यावरण बदल सहकार्यावर बोललो. "

फ्रान्सने भारताच्या कोविड प्रतिसादाला दिलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांचे आभार मानले. नेत्यांनी परस्पर हितसंबंधांच्या द्विपक्षीयप्रादेशिक आणि जागतिक विषयांवर चर्चा केली आणि नुकत्याच पार पडलेल्या भारत-युरोपियन महासंघाच्या नेत्यांच्या बैठकीच्या सकारात्मक निकालांवर समाधान व्यक्त केले. संतुलित आणि सर्वसमावेशक मुक्त व्यापार आणि गुंतवणूकीच्या करारासाठी चर्चा पुन्हा सुरू करण्याबाबत आणि भारत-युरोपियन महासंघाच्या संपर्क भागीदारी संदर्भातील घोषणा ही स्वागतार्ह भूमिका असल्याचे या दोन्ही नेत्यांनी मान्य केले. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीने अलिकडच्या वर्षांत केलेली प्रगती आणि सामर्थ्यावर दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले आणि कोविडनंतरच्या काळात एकत्र काम करत राहण्याचे मान्य केले.परिस्थिती अनुकूल झाल्यावर भारत दौर्‍यावर येण्याचे आमंत्रण पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांना दिले.