प्रत्येकाने मास्क लावणे क्रमप्राप्त : स्मृती इराणी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

प्रत्येकाने मास्क लावणे क्रमप्राप्त : स्मृती इराणी

नवी दिल्ली, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी नागरिकांना विशेष आवाहन केले. फेसबुकद्वारे आपले छायाचित्र प्रदर्शित करीत त्या म्हणाल्या, " सोमवारचा मंत्र-मंडे मंत्रा... कानातले, नथ घाला किंवा घालू नका पण मुखकवच जरूर घाला. कारण आताही दो गज की दुरी.. मास्क जरुरी...मुखकवच घाला... मास्क अप इंडिया... लसीकरण करा. "
नवरोझच्या शुभेच्छा
स्मृती इराणी यांनी नागरिकांना नवरोझच्या शुभेच्छा. ट्वीटरद्वारे स्मृती इराणी म्हणाल्या, " नवरोझ मुबारक! नूतन वर्ष आपल्या जीवनात नवीन आशा, उत्तम आरोग्य आणि भरपूर आनंद घेऊन येवोत. "
स्मृती इराणी यांच्या या विशेष आवाहनाने राजकारणापलीकडे त्यांच्यात दडलेल्या कलाकाराची झलक बघायला मिळते. बहुभाषी अभिनेत्री आणि बहुमुखी कलाकार स्मृती इराणींना इंग्रजी, हिंदी, बंगाली, पंजाबी, मराठी आणि गुजराती भाषेचे उत्तम ज्ञान आहे. एकेकाळी मनोरंजन मालिकेद्वारे भारताच्या घराघरात पोहचलेल्या स्मृती इराणी मोदी सरकार आणि भाजपमध्ये महत्वाच्या नेत्या आहेत.
स्मृती इराणी मोदी सरकारच्या दुस-या भागात महिला आणि बालविकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत. अमेठी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा पराभव करीत इराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवले आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात इराणी यांनी मनुष्यबळ विकास, माहिती व जनसंपर्क, आणि वस्त्रोद्योग या विभागात काम केले.जेष्ठ नेत्या मनेका गांधींच्या खात्याची जबाबदारी स्मृती इराणींकडे सोपवण्यात आली आहे.



2014 साली स्मृती इराणींना अमेठी लोकसभा मतदार संघातून राहुल गांधींसमोर पराभव सहन करावा लागला होता. मात्र पाच वर्ष अमेठीत काम करुन त्यांनी काँग्रेस अध्यक्षांना पराभूत केले. यापूर्वी स्मृती इराणी गुजरातमधून राज्यसभेच्या सदस्य होत्या.