देशाला केवळ अल्पकालीन आव्हानांवर मात करून चालणार नाही : निर्मला सीतारमण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : आरोग्य पायाभूत सुविधांची संपूर्ण सुधारणा पायाभूत सुविधांवरील लोकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाला सहाय्यभुत ठरेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ''नव्या भारतासाठी आरोग्यसेवा पायाभूत सुविधांची उभारणी " या वेबिनारला संबोधित करताना म्हणाल्या. देशाला केवळ अल्पकालीन आव्हानांवर मात करून चालणार नाही, आपल्या अर्थव्यवस्थेची लवचिकता आणि ही पायाभूत सुविधांचा विकास दुहेरी उद्दिष्टे देखील साध्य केली पाहिजे, असे सीतारमण म्हणाल्या.
वित्तमंत्री म्हणाल्या की, सरकारने उद्योग क्षेत्रासाठी मोठ्या विश्वासाने सुरू केलेली कोविड-प्रभावित क्षेत्रांसाठीच्या कर्ज हमी योजनेवरील (एलजीएससीएएस) चर्चासत्रात संबंधित उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी असणे हे खूप उत्साहवर्धक आहे.
निर्मला सीतारमण म्हणाल्या की, कोविड -19 महामारीच्या दुसऱ्या लाटेने आपल्या वैद्यकीय आणि आरोग्य सेवा पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याच्या आणि त्या बळकट करण्याच्या गरजेची तीव्रतेने जाणीव करून दिली जेणेकरून आपल्याला अशा कोणत्याही आरोग्यसेवेच्या संकटातवर मात करत अधिक सामर्थ्यशाली होता येईल.
कोविड -19 महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात बोलताना वित्तमंत्री म्हणाल्या की, सरकार महामारीमुळे प्रभावित झालेल्या गोष्टीं पुनरुज्जीवीत करत आहे.आणि कोविड -19 विरूद्ध हे एकमेव खात्रीशीर संरक्षण असणारे लसीकरण वाढवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.