राज्यात महाविद्यालये कधी सुरू होणार? उदय सामंत यांची मोठी घोषणा!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
करोना प्रादुर्भावामुळे राज्यातली सर्व शाळा महाविद्यालयं सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. ऑनलाईन शिक्षणावरच सध्या सगळी मदार आहे. मात्र आता महाविद्यालयं उघडण्यासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.
उदय सामंत आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. सीईटी परीक्षेच्या तारखाही सामंत यांनी यावेळी जाहीर केल्या. ते म्हणाले, यावर्षी सीईटीला एकूण आठ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची १९७ केंद्रे होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून २२६ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने यंदा ही परीक्षा घेतली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.
महाविद्यालयं सुरू करण्याबाबत ते म्हणाले, १ नोव्हेंबरपासून राज्यातली सर्व महाविद्यालयं सुरू कऱण्याचा आमचा मानस असून त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत.