देशात 14 तासात 38, 949 नवे कोरोनाग्रस्त
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत देशात 38 हजार 949 नव्या कोरोनोबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 40 हजार 26 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत देशात 542 लोकांना साथरोगामुळे आपला जीव गमवावा लागल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.
भारतात आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 26 हजार 829 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 कोटी 01 लाख 83 हजार 876 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सध्या कोरोनाचे 4 लाख 30 हजार 422 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना विषाणूने देशातील 4 लाख 12 हजार 531 लोकांचा आतापर्यंत जीव घेतला आहे. देशातील रिकव्हरी रेट 97.28 टक्के झाला आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या 1.39 टक्के आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात आलीये. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 39 कोटी 53 लाख 43 हजार 767 लोकांनी कोरोना प्रतिबंधल लशीचा किमान एक डोस घेतला आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 44 कोटी 23 हजार 239 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 15 जुलैला 19 लाख 55 हजार 910 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.