‘त्याला’ संघात आणणे म्हणजे इतर कोणालाही कमी लेखणे नव्हे – बीसीसीआय
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जवळपास एका वर्षानंतर, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा टीम इंडियासोबत दिसणार आहे. मात्र, यावेळी त्याची भूमिका वेगळी असेल. बीसीसीआयने संघाची घोषणा केल्यानंतर, दोन वेळा विश्वचषक विजेत्या कर्णधाराची टी-२० विश्वचषक २०२१ साठी टीम इंडियाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून निवड केली. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी अलीकडेच धोनीच्या या भूमिकेबद्दल मत दिले. शिबिरामध्ये धोनीच्या उपस्थितीचा भारताला नक्कीच फायदा होईल, असे धुमाळ म्हणाले.
अरुण धुमाळ म्हणाले, “तो (धोनी) एक महान कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वकप, २०११ विश्वकप, २०१६ आशिया कप, आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्याचे रेकॉर्ड जबरदस्त आहेत. आयसीसी विश्वचषकासाठी त्याला संघाचा मार्गदर्शक म्हणून घेणे खूप चांगले आहे. त्याला संघात चांगली प्रतिष्ठा आणि आदर आहे, आणि त्याला आणणे म्हणजे कोणालाही कमी लेखणे नाही.”
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२० मध्ये होणार होता. पण करोनामुळे तो स्थगित करण्यात आला. आता ही स्पर्धा २०२१ मध्ये होणार आहे आणि ती भारताऐवजी यूएई आणि ओमानमध्ये खेळली जाणार आहे. ही स्पर्धा मस्कत, अबुधाबी, दुबई आणि शारजाह या चार ठिकाणी खेळली जाईल.
जेव्हा विराट कोहलीला टी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय स्वतःचा होता, की त्याला बीसीसीआयने सांगितले, यावर धुमाळ म्हणाले, “बोर्डाने त्यांना पद सोडण्यास सांगितले नाही. तो पूर्णपणे त्याचा स्वतःचा निर्णय होता. आम्ही त्यांना हे का करायला सांगू? तो उत्तम काम करत होता.”