टोक्यो ऑलिम्पिक : कुस्तीपटू विनेश फोगटसाठी आजचा दिवस कही खुशी कही गम..
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटसाठी आजचा दिवस काहीसा कही खुशी कही गम.. असाच म्हणावा लागेल. कारण विनेशने स्वीडनच्या सोफिया मेडालेनाला धोबीपछाड देत ५३ किलो वजनी फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र त्यानंतर काही वेळातच झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत विनेशचा बेलारुसची कुस्तीपटू वेन्स कलाडझिंस्कायाने ३-९ अशा फरकाने पराभव झाला.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील आजचा १४वा दिवस होता. कुस्तीपटू विनेश फोगटने ५३ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात स्वीडनच्या सोफिया मेडालेनाशी सामना झाला. यात विनेशने सोफियाचा ७-१ अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे विनेशकडून सुवर्ण कामगिरीची अपेक्षा वाढली होती. मात्र त्या अल्पावधीतच भंगल्या. त्यानंतर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत विनेशची लढत बेलारुसची कुस्तीपटू वेन्स कलाडझिंस्कायासोबत झाली. सामन्याच्या सुरूवातीला वेन्सने आघाडी घेतली आणि ती पुढेही कायम राहत विनेश २-५ ने पिछाडीवर पडली. पुढे वेन्सने ९-३ अशा फरकाने विनेशवर विजय मिळवला. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेश भारताला सुवर्ण पदक जिंकवून देणारी पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली. त्यामुळे भारतीयांना तिच्याकडून आताही सुवर्ण पदकाची अपेक्षा होती.