केजरीवाल यांनी 31 मे पर्यंत वाढवले निर्बंध, केस कमी झाल्यास लॉकडाऊनमध्ये शिथिलता
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : दिल्लीत 1 जूनपासून लॉकडाऊनमध्ये सूट मिळू शकते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
यांनी रविवारी सांगितले की, आम्ही लॉकडाऊन एक आठवड्यापर्यंत म्हणजे 31 मेपर्यंत वाढवत आहोत.
त्याचबरोबर, ते असेही म्हणाले की, जर कोरोना केस आताप्रमाणे कमी होत राहिल्या तर आम्ही हळूहळू
लॉकडाऊन कमी करू.
केजरीवाल म्हणाले की, केस कमी होत आहेत आणि पॉझिटिव्ह रेटही खाली आला आहे. तिसरी लाट येण्याची
शक्यता आहे आणि आम्ही त्यासाठी तयारी करीत आहोत. परंतु तिसरी लाट येऊच नये. सर्व निरोगी रहा, ही
आमची प्रार्थना आहे.
संक्रमणाचे प्रमाणही 2.5% टक्क्यांच्या खाली
ते म्हणाले की, दिल्लीतील कोरोनाची ही लाट आता कमकुवत होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत
संक्रमणाचे प्रमाणही 2.5% टक्क्यांच्या खाली गेले आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाची 1,600 प्रकरणे
आढळून आली आहेत.
आतापर्यंत 14.15 लाख लोकांना संसर्ग
दिल्लीत आतापर्यंत 14.15 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 13.60 लाख लोक बरे झाले आहेत, तर
23,013 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे 31,308 लोकांवर उपचार सुरू आहेत.