जेष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांचं नागपूरमध्ये निधन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
जेष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांचं नागपूरमध्ये निधन
जेष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांचं निधन झालंय. ७९ व्या वर्षी त्यांनी नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या
काही दिवसांपासून राम लक्ष्मण यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी पहाटे त्यांची प्राण ज्योत मालवली.
शनिवारी दुरापी १२ वाजता त्यांच्या प्रार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते
मुलाकडे नागपूरमध्येच राहत होते.
राम लक्ष्मण यांचं खरं नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर
सोडून मुंबईला आले. आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण
स्वत:चा स्वतंत्र ठसाही उमटवला. विजय पाटील म्हणून नाही तर संगीतकार राम लक्ष्मण म्हणून. राम लक्ष्मण
यांच्या नावावर एक दोन नाही तर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकाहून एक
सरस, सुपरहिट गाणी दिली.
या सिनेमांना दिलं संगीत
पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे
एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी. हीच परिस्थिती ‘राजश्री प्रॉडक्शन’च्याही बाबतीत.
‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही तर यशस्वीही झाले.
१९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम
साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.