काँग्रेसच्या आंदोलनात करोना नियम धाब्यावर - प्रविण दरेकर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काँग्रेसच्या आंदोलनात करोना नियम धाब्यावर - प्रविण दरेकर

मुंबई, : मोदी सरकराला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसनं मुंबईसह राज्यात आंदोलन केलं. पण या आंदोलनात करोना नियमांचा पूर्ण फज्जा उडाला असुन अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. कोविड संसर्गा रोखण्यासाठी आखलेले नियम सत्ताधारी पक्षाकडुन मोडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाला एक न्याय आणि जनसामान्यांना विरोधी पक्षातील नेत्यांना दुसरा न्याय, सरकार कसा लावू शकतेमी आंदोलन केले तर माझ्यावर कारवाई केली, गुन्हे नोंदवले तशी कारवाई मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांवर लावण्याची हिम्मत दाखवणार का, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला आहे

प्रवीण दरेकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवरून राज्यसरकार वर ह्ल्लाबोल केला. संजय राऊत आणि शिवसेना यांना स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विसर पडला आहे. त्यांना सध्या फक्त काँग्रेस आणि जवाहर लाल नेहरू यांची पुण्याई आठवतेकेंद्रातील भाजप सरकारच्या 7 व्या वर्षपूर्तीनिमित्त कॉग्रेस पक्षांने केलेल्या आंदोलनाला लोकांनी प्रतिसादच दिला नाही, अशी जहरी टीका प्रवीण दरेकर यांनी केली..

 

आमचे सात वर्षांत मोजता तुम्हांला ७० वर्षाचा विसर पडला का?

 

मोदी सरकारचे सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा फुसका बार झाल्याचं दरेकर म्हणाले. वर्षात आम्ही काय केलं ते सांगायला तयार आहोत. पण तुम्ही ७० वर्षांत काय केलं ते सांगायला तयार आहात का? असा सवाल करताना दरेकर यांनी अनुच्छेद ३७०, महिलांना गॅस, जीएसटी, सामाजिक संतुलन रख्याण्यासाठी तीन तलाकचा निर्णय, CAA अशा मोदी सरकारच्या निर्णयाची आठवण करून दिली. तसेच कोरोना संकटाची दोन वर्ष सोडली तर सातत्यानं देशाचा जीडीपी वाढल्याचंही दरेकर म्हणाले.

 

राज्य सरकार संवेदनाहिन..

 

बुलढाणा येथे झालेली घटना दुर्दैवी आहे, सरकारच्या संवेदना मेल्या असुन वर्षाच्या मुलांकडून कोविड सेंटर मध्ये साफसफाईचे काम करून घेणं दुर्दैवी आहे. सध्या जी कोविड सेंटर सूरू आहेत. त्यांची आरोग्य व्यवस्था अशाच पद्धतीच्या आहे. कोविड सेंटर मध्ये बाथरूम खराब, महिलांची सुरक्षा, जेवण चांगले नाही या सर्व गोष्टी नियंत्रण करणाऱ्यांनी नीट पाहण्याची आवश्यकता आहे. समन्वय नसल्या कारणामुळे आज कोविड सेंटर मध्ये गोंधळ सुरू असल्याची टिका दरेकर यांनी केली.

 

लॉकडाऊनबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यानी फक्त लोकांशी संवाद साधु नये तर त्यांनी लोकांच्या मागणीचा आणि भावनांचा विचार केला पाहिजे.. एकीकडे लॉकडाऊनची घोषणा करता तर दुसरीकडे तुम्ही रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होत असल्याचं सांगत आहात. तर मग तसा दिलासाही द्यायला हवा. कारण लॉकडाऊन मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, असं दरेकर म्हणाले.