ओबीसी-बहुजन कल्याण विभागात पदभरतीला प्राधान्य!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसेच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते. ओबीसी व बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयासाठी सामाजिक न्याय भवनात जिथे जागा उपलब्ध आहेत तिथे जागा उपलब्ध करून द्यावी. विभागाच्या योजना, शिष्यवृत्ती यासह आवश्यक निधीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत, असा आदेश ठाकरे यांनी दिला. ओबीसी विभागाचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र आस्थापना व्हावी. कल्याणकारी योजनांकरिता, शिष्यवृत्तीसाठी, वसतिगृहांसाठीचे अनुदान, विविध महामंडळांसाठीही निर्धारित केलेला निधी मिळावा. महाज्योती संस्थेसाठी पदभरती, आश्रमशाळांसाठी पदभरती याबाबतही चर्चा झाली.