ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न कोरोना पॉझिटिव्ह
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्नला कोरोनाची लागण झाली आहे. शेन वॉर्नचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याने स्वतः ला सेल्फ आयसोलेट करून घेतले आहे. शेन वॉर्न सध्या ‘द हंड्रेड’ची टीम लंडन स्पिरीटचा मुख्य प्रशिक्षक आहे. शेन वॉर्न व्यतिरिक्त टीममधील अजून एक जण पॉझिटिव्ह आला आहे. लंडन स्पिरिट विरूद्ध सदर्न ब्रेव हा सामना लॉर्ड्स येथे होणार होता. मात्र, सामना सुरू होण्याआधीच शेन वॉर्न आजारी पडला. शेन वॉर्नने चाचणी केली असता त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चांगली बाब म्हणजे अद्याप लंडन स्पिरिट संघातील खेळाडू पॉझिटिव्ह आलेले नाहीत.