आयपीएलवर करोनाचं सावट आल्याने बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आयपीएलवर करोनाचं सावट आल्याने बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बायो-बबलच्या सुरक्षेत सुरु असणाऱ्या आयपीएलला सोमवारी मोठा झटका बसला. कोलकाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुविरोधात होणारा सामना पुढे ढकलण्यात आला. दरम्यान चेन्नई संघाच्या तीन सदस्यांनाही करोनाची लागण झाली आहे. बायो-बबलमध्येही करोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आयपीएलवरही करोनाचं सावट आल्याने बीसीसीआय चिंतेत असून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार करत आहे. मुंबईतील वानखेडे, डी वाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन मैदानांमध्ये हे सामने खेळवले जाऊ शकतात. वानखेडेत आतापर्यंत आयपीएलचे दहा सामने पार पडले आहेत. इतर दोन मैदानं फक्त सरावासाठी वापरली गेली होती.

सोमवारी कोलकाताच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आल्यानंतर बंगळुरुसोबतचा सामना पुढे ढकलण्यात आला. संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती सध्या विलगीकरणात असून आरोग्य तज्ञ त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान कोलकाता संघदेखील क्वारंटाइनमध्ये आहे.