अभिनेते हेमंत जोशी यांचे करोनामुळे निधन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘जीव झाला येडापिसा’मध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते हेमंत
जोशी यांचे निधन झाले आहे. करोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. १९ मे रोजी हेमंत यांनी अखेरचा
श्वास घेतला. हेमंत यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
अभिनेता सुप्रित निकमने सोशल मीडिया पोस्टद्वारे हेमंत जोशी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याने हेमंत
यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘काय लिहू आणि कसं लिहू सुचेना.. हेमंत काका नुकताच “जीव झाला
येडपिसा” मधून तुम्ही घराघरात पोहोचला होता. लोक तुम्हाला जोशी कमी आणि जीव झाला मधले भावे म्हणून
ओळखायला लागले होते. तुमच्या किती आठवणी सांगू तितकं कमी आहे’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.