सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सिंधुदुर्ग, : अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारे बहुप्रतिक्षित चिपी विमानतळ लोकसेवेसाठी सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन संपन्न झाले आणि सिंधुदुर्गवासीयांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली. चिपी विमानतळाचे लोकार्पण झाल्याने आता सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण जगाशी जोडला गेला आहे. यावेळी उदघाटन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक, जनरल (डॉ.) बी. के. सिंह (सेवानिवृत्त), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार, मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यसभा सदस्य सुरेश प्रभू, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य दीपक केसरकर, नागरी विमान वाहतूक सचिव राजीव बन्सल, विधानपरिषद सदस्य बाळाराम पाटील, विधानसभा सदस्य वैभव नाईक, अप्पर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह, विभागीय आयुक्त कोकण विभाग विलास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, लोकसभा सदस्य विनायक राऊत, विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य नितेश राणे, प्रधान सचिव, विमानचालन, पर्यटन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री वल्सा नायर सिंह, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी दीपक कपूर आदी उपस्थित होते.