रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर, रेपे रेट कायम
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने जून आणि जुलै महिन्याचे पतधोरण जाहीर केलेय. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या
अध्यक्षतेत झालेल्या आरबीआयच्या पतधोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर जाहीर केलेल्या पतधोरणात
रेपो रेट 4 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आलाय.
गव्हर्नर दास यांच्या नेतृत्वाखाली बैठकीला बुधवारी 2 जून रोजी प्रारंभ झाला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत
दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या तीन दिवसांच्या बैठकीनंतर द्विमासिक पतधोरणाची घोषणा केली गेली.
मध्यवर्ती बँक यंदाही प्रमुख व्याजदर स्थिर ठेवेल, असा अंदाज पूर्वी पासूनच व्यक्त केला जात होता. पतधोरण
समितीची या आर्थिक वर्षातील ही दुसरी बैठक होती. रिझर्व्ह बँकेने 5 मे रोजी रोकड सुलभतेचे नियमन
करण्यासाठी विविध उपाय जाहीर केले होते. रिझर्व्ह बँकेने नुकताच नऊ महिन्यांच्या आर्थिक वर्षाचा अहवाल
सादर केला असल्याने या बैठकीचे प्रासंगिक महत्त्व तसे कमीच असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलेलं.
आरबीआयने मार्जिनल स्टॅण्डींग फॅसिलीटी म्हणजेच एमएसएफ दर 4.25 टक्क्यांवर कायम ठेवले असून
आवश्यकता असेल तोपर्यंत हे दर स्थिर ठेवले जातील असं दास यांनी स्पष्ट केलेय. रेपे रेट सोबतच आरबीआयने
रिझर्व्ह रेपो रेट आणि कर्ज दरसुद्धा 3.5 टक्क्यांवर कायम ठेवले आहेत. केंद्रीय बँकेने अर्थव्यवस्थेचा वाढीचा
अंदाजित टक्केवारी आधीपेक्षा एका टक्क्यांनी कमी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था 9.5 टक्कांचा विकासदर
साधेल असा अंदाज व्यक्त केलाय. पूर्वी हा दर 10.5 असेल असे सांगण्यात आले होते. परंतु, कोरनाच्या दुसऱ्या
लाटेचा फटका आर्थिक विकासाला बसल्याने या विकासदरामध्ये एका टक्क्यांनी घट करण्यात आलीय.