अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होतांना दिसत आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. देशमुख यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ईडीने नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून संरक्षण मागितले होते. अटकेची कारवाई टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की कायदेशीर उपाय फक्त कायदेशीर तरतुदींनुसारच करता येतात.
सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा भडीमार सुरु ठेवला आहे. यामध्ये त्यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे. जी त्यांच्या आणि कंपनीच्या नावावर होती. याप्रकरणी आपल्यावर कुठलीही कठोर कारवाई म्हणजेच ईडीेने अटक करु नये, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी इतर उपलब्ध पर्यांयाचा देशमुख यांनी वापर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात अनेक वेळा समन्स बजावले होते.
अनिल देशमुखांना आता अटक टाळायची असेल तर त्यांनी रीतसर अटकपुर्व जामीनाठी कोर्टात याचिका करावी. त्यावर मुंबईतील स्थानिक न्यायालय निर्णय घेते. आम्ही तुम्हाला कुठलाही दिलासा देऊ शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे.