या’ कारणामुळे शिवलीला पाटील यांनी घेतली बिग बॉसच्या घरातून माघार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

या’ कारणामुळे शिवलीला पाटील यांनी घेतली बिग बॉसच्या घरातून माघार

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. १९ सप्टेंबर रोजी बिग बॉस मराठी सिझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शोमध्ये कलाकरांसोबतच किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील या सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. पण आता शिवलीला यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. पण त्या घरातून बाहेर का पडल्या? असा प्रश्न अनेकांना पडला होता. बिग बॉस हा कार्यक्रम आणि अनिश्चितता यांच खूप जवळच नातं आहे. या खेळात कधी काय घडेल ? हे कोणच सांगू शकत नाही. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली ती म्हणजे तृप्ती देसाई आणि शिवलीला बाळासाहेब पाटील. अत्यंत वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या दोन्ही महिलांनी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. नुकताच कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बिग बॉस मराठी ३’चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, ‘प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉस मराठी ३च्या घरातून शिवलीला पाटीलने माघार घेतली. पाहूया बिग बॉसच्या घरातला तिचा प्रवास’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.