मार्च तिमाहीत 1.6 टक्के वाढ; वित्त वर्ष 2020-21 मध्ये जीडीपी वृद्धिदरात 7.3% घसरण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालयाने सोमवारी जीडीपीची (सकल राष्ट्रीय उत्पादन) अंतरिम आकडेवारी जारी केली. जानेवारी-मार्च तिमाहीत देशाचा जीडीपी वृद्धिदर १.६ टक्के राहिला. याउलट या तिमाहीत जीडीपी वृद्धिदर ०.६% ते १.३% राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. मात्र वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपीत ७.३% घसरण झाली. सरकारचा ७.५% ची घसरण होण्याचा अंदाज होता. वित्त वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपी ४% वेगाने वाढला होता. एनएसओने जानेवारीत नॅशनल अकाउंट्सच्या पहिल्या अंदाजात २०२०-२१ मध्ये ७.७% घसरणीचा अंदाज वर्तवला होता. यानंतर दुसऱ्या सुधारित अंदाजात ८% घसरणीची शक्यता वर्तवली होती.
दरडोई उत्पन्नात ८.२४% घट, एकूण उत्पन्न ९९,६९४ रुपये
महामारीमुळे देशाच्या दरडोई उत्पन्नात ८.२४% ची (८,९५१ रुपये) घसरण पाहायला मिळाली आहे. वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये ते ९९,६९४ रुपये राहिले. गेल्या वित्तवर्षात (२०१९-२०) दरडोई उत्पन्न १ लाख ८,६४५ रुपये होते.
महसुली तूट ९.३%, हीदेखील सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच
वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये महसुली तूट सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच राहिली. अर्थ मंत्रालयानुसार, महसुली तूट १८,२१,४६१ कोटी रुपये आहे. ती देशाच्या जीडीपीच्या ९.३% इतकी आहे. ती अर्थ मंत्रालयाचा अंदाज ९.५% पेक्षा कमी आहे. वित्त वर्ष २०१९-२० मध्ये महसुली तूट ४.६% होती.
कोरोना संकटातही भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे : तज्ज्ञ
कोरोना संकटातही भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. चालू वित्त वर्षात अर्थव्यवस्था रुळावर आली आहे. ती १०% दराने वाढत आहे. ब्लूमबर्गने १२ अंदाजांच्या आधारे हा दावा केला आहे. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात १.६% वाढ झाली. राज्यांत अनलॉक व ग्राहकांची खर्च करण्याच्या इच्छेवर रिबाउंडची ताकद ठरेल. मागील वर्षीही असेच झाले होते. तेव्हा मोबाइल फोन ते कारसारख्या उत्पादनांची मागणी वाढली होती.
गेल्या काही आठवड्यांत अर्थतज्ज्ञांनी राजकीय, वाणिज्यिक हालचाली व स्थानिक निर्बंधांच्या आधारे अर्थव्यवस्थेतील रिकव्हरी गांभीर्याने घेण्याचा सल्ला दिला होता. पॅरिसच्या आर्थिक सहकार्य व विकास संघटनेनेही मार्चमध्ये भारतात विकास दर १२.६% वर जाण्याचा अंदाज वर्तवला होता. तथापि, त्यांनी तो ९.९% वर आणला आहे. क्वांटइको रिसर्चच्या अर्थतज्ज्ञ युविका सिंघल म्हणाल्या, कुटुंबे खर्चाएेवजी बचतीवर भर देतील.