रेशन दुकानात करता येणार पासपोर्टसाठी अर्ज
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालय आणि ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील रेशन दुकानात कॉमन सर्व्हिस सेंटर बनवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पॅनकार्ड आणि पासपोर्टसाठी रेशन दुकानात अर्ज करता येतील.
यासंदर्भात केंद्रीय अन्न मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉमन सर्व्हिस सेंटर बनवली जाणार असून अनेक सुविधा नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे आता रेशन दुकानात पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचे बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. रेशन धान्य दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना सुविधा पुरविण्याबाबत निवड करता येणार आहे.
रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचं बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. सीएससी अंतर्गत विविध सुविधा पुरवल्या जाणार असल्या तरी आपल्याला योग्य वाटतील अशा सेवांसाठी रेशन दुकानदार अर्ज करू शकतील. या सुविधा रेशन दुकानात उपलब्ध करून देण्याचा पर्याय रेशन दुकानदारांसमोर असणार आहे. या सुविधांचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच उपयोग होणार असून या कामांसाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार आहे. या सुविधा इतरत्रही उपलब्ध आहेत, यामुळे रेशन दुकानांचं उत्पन्न वाढायलाही मदत होणार आहे. रेशन दुकानातून धान्य खरेदी करतानाच नागरिक पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्जही भरू शकणार आहेत.