मुंबईत २,६६२ नवे बाधित, ७९ रुग्णांचा मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी सोमवारी अवघ्या २३ हजार ५४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णसंख्या घसरल्याचे निदर्शनास आले. सोमवारी दोन हजार ६६२ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली असून ७९ रुग्णांचा मृत्यू झाला.
मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करुन करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून चाचण्याचे प्रमाण घसरू लागले आहे. सोमवारी २३ हजार ५४२ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ५५ लाख १३ हजार ७८३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी २,६६२ नवे रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या सहा लाख ५८ हजार ८६६ वर पोहोचली आहे.
विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ५२ पुरुष आणि २६ महिलांचा सोमवारी करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत १३ हजार ४०८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे पाच हजार ७४६ रुग्ण सोमवारी करोनामुक्त झाले. नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक बाधित सोमवारी करोनामुक्त झाले. आतापर्यंत पाच लाख ८९ हजार ६१९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८९ टक्क्य़ांवर पोहोचले असून त्यामुळे उपचाराधिन रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.