मुंबईत पूल कोसळून १४ जण जखमी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत पूल कोसळून १४ जण जखमी

मुंबई  : मुंबईतल्या बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये काम सुरु असलेल्या एका पुलाचा भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एकूण १४ जण जखमी झाले आहेत. पहाटे ४.४० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमींना व्ही.एन. देसाई रूग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

हा अपघात झाला तेव्हा पुलावर तब्बल २० ते २५ मजूर काम करत होते. त्यावेळी या पुलाचा एक भाग निखळून खाली पडायला सुरुवात झाली. काही मजूरांना त्याचा अंदाज आल्याने मजूरांनी पुलावरुन वेळीच पळ काढला. काही कामगारांनी घाबरुन जवळच्या पाण्याच्या टाकीत उडी मारली. तर, काहीजण पुलाला असलेल्या सळईला पकडून लटकले.या पूल दुर्घटनेत १४ जण अडकून जखमी झाले आहेत. जखमींवर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



जखमींची नावे
अनिल सिंह (२८) अरविंद सिंह (२९) अझर अली (२६) मुस्तक अली (२८) रियाझुद्दीन (२३) मोताब अली (२८)
रियाझु अली (२१) श्रावण (४९) अतिश अली (२२) रलीस अली (२२) एझाझ-उल-हक (२९) परवेझ (२२)
अकबर अली (२५) श्रीमंत (२५)