महाविकास आघाडी सरकारमधील नेते म्हणजे सर्कसमधील विदूषक : सदाभाऊ खोत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सोलापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असून सरकारमधील नेते हे सर्कसमधील विदूषक आहेत, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी केली आहे. पूनम गेटवर आयोजित आंदोलनात खोत बोलत होते.सन 2021 व 2022 मधील गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात रयत क्रांती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील पूनम गेटवर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा आणला. मोर्चात बोलताना त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल केला.
एफआरपीसोबत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील पूनम गेटवर मोर्चा आला. मोर्चातील कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकार विराेधी फलके घेऊन शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त पूनम गेटवर तैनात होता.शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रयत क्रांती संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला संजय कोकाटे व छावा संघटनेने पाठिंबा दिला. मोर्चामध्ये रयत क्रांती संघटनेचे शेतकरी उसाची मोळी घेऊन सहभागी झाले.