फ्रान्सच्या माजी अध्यक्षांना नजरकैदेची शिक्षा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : निवडणुकीत प्रचारात अधिकचा खर्च केल्याप्रकरणी फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सर्कोझी यांना न्यायालयाने एक वर्षाची नजरकैदेची शिक्षा सुनावली आहे. २०१२ मध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. या निवडणुकीत त्यांनी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम खर्च केली होती. यासंदर्भातच न्यायालयाने नजर कैदीचा निकाल सुनावला आहे. ही शिक्षा त्यांना घरीच इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली भोगण्याची परवानगी न्यायालयाने त्यांना दिली आहे.
२००७ ते २०१२ या काळात निकोलस सर्कोझी हे फ्रान्सचे अध्यक्ष होते. आपल्यावरील आरोप त्यांनी नाकारले आहेत. त्यामुळे या शिक्षेविरोधात अपील करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील खर्चाची मर्यादा ही २२.५ युरो इतकी होती. मात्र त्यांनी त्याहून दुप्पट रक्कम खर्च केल्याचा आरोप आहे. या निवडणुकीत सोशालिस्ट पार्टीचे फ्रँक्वा ओलांद यांनी त्यांचा पराभव केला होता.