न्यूज ऑन एअर ॲपवरील आकाशवाणी थेट - प्रसारणाची भारतातील क्रमवारी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : न्यूज ऑन एअर ॲपवरील आकाशवाणीचे थेट प्रसारण जयपूर आणि पटनामधील युवा वर्गात बरेच लोकप्रिय आहे. या 2 शहरांमधील आकाशवाणीच्या थेट प्रसारणाचे 60% श्रोते सुमारे 18-45 वयोगटातील आहेत. नवीन आणि मनोरंजक गोष्टींची भर घातल्यामुळे प्रमुख शहरांसाठी लोकसंख्याशास्त्रीय वितरणानुसार न्यूज ऑन एअर क्रमवारीसाठी मापन करताना हा परिणाम दिसून आला आहे.
आकाशवाणीच्या मराठी प्रसारणाव्यतिरिक्त आकाशवाणीच्या कन्नड आणि हिंदी थेट प्रसारणालाही पुणे शहराने पसंती दर्शवत आपले कॉस्मोपॉलिटिन रूप दाखवले आहे. प्रसार भारतीचे अधिकृत ॲप असलेल्या न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीच्या 240 हून अधिक सेवांचे थेट प्रसारण होते. जिथे न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचे थेट प्रसारण सर्वाधिक लोकप्रिय आहेत.भारतातील मुख्य शहरांवर एक नजर टाकूया. ही क्रमवारी 1 जुलै ते 15 जुलै 2021 या पंधरवड्याच्या आकडेवारीवर आधारित आहे.