निवासी स्थावर मालमत्ता क्षेत्रात रेरा आणि जीएसटीसारखे नियम लागू झाल्यानंतर संघटित क्षेत्र म्हणजे ब्रँडेड लिस्टेड आणि टॉप अनलिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी आधीपेक्षा वाढली आहे. वित्त वर्ष २०१७ मध्ये जिथे ब्रँडेड आणि टॉप अनलिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी एकूण विक्रीत १७ टक्के होती, तिथे वित्त वर्ष २०२१ च्या आधी ९ महिन्यांत (एप्रिल ते डिसेंबर २०२०) हे वाढून ४०% झाली. मालमत्ता कन्सल्टंट एनारॉकच्या ताज्या अहवालानुसार, वित्त वर्ष २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यांत देशाच्या अव्वल ७ शहरांत एकूण ९३,१४० घरे विकली. त्यात टॉप ८ लिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी २२% राहिली. प्रमुख अनलिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी १८% आणि अन्य(नॉन ब्रँडेड) रिअल इस्टेट विकासकाची हिस्सेदारी ६०% राहिली. २०१७ चा विचार करायचा झाल्यास लिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी ६% होती. अनलिस्टेड कंपन्यांची हिस्सेदारी ११% तर ८३% हिस्सेदारी इतर (नॉन ब्रँडेड) रिअल इस्टेट डेव्हलपर्सची होती. कोविड-१९ महामारीनंतरही टॉप ८ लिस्टेड कंपन्यांनी वित्त वर्ष २०२१ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये २१२.३ लाख चौ. फूट क्षेत्र विकले. हे वित्त वर्ष २०२० च्या या तिमाहीच्या तुलनेत २% जास्त आहे. या डेटातून घर खरेदी करणाऱ्या लोकांची आवडही लक्षात येते.