जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने भारतात 12 ते 17 वर्षातील मुलांवर ट्रायलसाठी मागीतली परवानगी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने भारतात आपल्या कोरोना लसीसाठी 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर ट्रायलसाठी परवानगी मागतली आहे. अमेरिकन फार्मा कंपनीने म्हटले आहे की व्हायरस रोखण्यासाठी मुलांना शक्य तितक्या लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे. रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी, लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू ठेवाव्या लागतील.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ही लस प्रत्येक व्यक्तीला सहज उपलब्ध व्हावी अशी आमची इच्छा आहे. या प्रयत्नात आम्ही सतत गुंतलेलो आहोत. मंगळवारी जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडे मंजुरीसाठी अर्ज पाठवला आहे.
जॅन्सनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी
आपत्कालीन वापरासाठी सरकारने जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या सिंगल-डोसच्या लसीला आधीच मान्यता दिली आहे. याला भारतीय औषध नियंत्रक महासंचालनाकडून (DCGI) मान्यता मिळाली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.
मुलांवर कोव्हॅक्सिन चाचणी
ICMR-NIV च्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहम यांनी गुरुवारी सांगितले, की पहिली लस सप्टेंबरपर्यंत मुलांसाठी उपलब्ध होऊ शकते. या व्यतिरिक्त, इतर अनेक लस देखील उपलब्ध आहेत. त्या म्हणाल्या की मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या सुरू आहेत. अपेक्षित आहे की लवकरच निकाल बाहेर येतील, जे नंतर रेगुलेटर्स यांच्या समोर ठेवावे लागतील.
जॅन्सन लस कोरोनावर 85% प्रभावी
अभ्यासात असे आढळून आले की जॅन्सन लस कोरोनाच्या सौम्य लक्षणांवर 66% प्रभावी आहे आणि गंभीर प्रकरणांमध्ये 85% प्रभावी आहे. कंपनीचा दावा आहे की ती लसी मिळाल्यानंतर 28 दिवसांच्या आत मृत्यूदर कमी करण्यास आणि रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची संख्या कमी करण्यास सक्षम आहे.