गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल याची राज्य शासन पूर्ण काळजी घेईल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी,संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे.उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे.सर्व गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाचे सहकार्य घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे.