अनिल देशमुखांना मंगळवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ईडीचे समन्स

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अनिल देशमुखांना मंगळवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे ईडीचे समन्स

मुंबई  : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु देशमुख यांनी वकिलांमार्फत वेळ मागून घेतला. यावर आता ईडीने देशमुखांना मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले आहे.

 

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणाचे धागेदोरे देशमुख यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे ईडीकडून त्यांना शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ते उपस्थित न होता पुढील वेळ मागून घेतली. त्यावर ईडीने देशमुखांना मंगळवारी बोलावले आहे.