नांदगाव ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य उपकेंद्राला औषधांचे वाटप
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
कोर्लई : राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असतांना तिला थोपवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करीत आहे.नांदगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून यशवंतनगर पंचक्रोशीतील कै. काशिनाथ पांडुरंग कुलकर्णी आरोग्य उपपकेंद्राला मास्क,सॅनिटायझर व औषधांचे नुकतेच वाटप करण्यात आले.
आरोग्यकेंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमास नांदगावच्या सरपंच वैशाली पवार,उपसरपंच अस्लमभाई हलडे, सदस्य विक्रांत कुबल, ग्रामविकास अधिकारी जी.के.म्हात्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नजिर कबले,परिचारीका शुभांगी दळवी,चौलकर,म्हात्रे तसेच ग्राभपंचायतीचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.