“२०२४ मध्ये माझ्या पदकाचा रंग बदललेला असेल”, लव्हलिनाची जिद्द

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“२०२४ मध्ये माझ्या पदकाचा रंग बदललेला असेल”, लव्हलिनाची जिद्द

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनचा उपांत्य फेरीत पराभव झाल्याने सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले, मात्र पराभूत झाल्यानंतरही कांस्यपदक जिंकत लव्हलिनाने नवा विक्रम रचला. ईशान्य भारतामधील राज्यांमधून आलेली आणि ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी लव्हलिना तिसरी महिला आहे. तसेच मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांच्यानंतर बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

टोक्योमधील दमदार कामगिरीनंतरही लव्हलिनाला सुवर्णपदक हुकल्याची खंत आहे. २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये तिच्या डोळ्यासमोर सुवर्णपदकाचे ध्येय आहे. तिने आपल्या नव्या ट्वीटमध्ये याबाबत प्रतिक्रिया दिली. ”माझी वर्षानुवर्षांची मेहनत शेवटी फळाला आली. ऑलिम्पिक पदक मिळवणे हे माझे स्वप्न होते आणि शेवटी मी त्या क्षणाची कदर करू शकले. २०२४ ऑलिम्पिकमध्ये पदकाचा रंग बदलणे हे माझे पुढील ध्येय असेल. मी हे पदक संपूर्ण राष्ट्राला समर्पित करत आहे”, असे लव्हलिनाने म्हटले. लव्हलिनाने कांस्यपदकावर आपले नाव कोरताना खास विक्रम केला. ऑलिम्पिकमध्ये लव्हलिना बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. याआधी मेरी कोमने ही कामगिरी केली आहे.