सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजारांखाली
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
चंद्रपूर : जिल्ह्यातून दिलासादायक बातमी आली आहे. मागील आठवडाभरापासून रुग्ण संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे.ॲक्टीव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजारांखाली आली आहे. दरम्यान मंगळवारपर्यंत जिल्ह्यात 4 हजार 627 बाधितांवर उपचार सुरू होते . जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 81 हजार 512 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 75 हजार 483 झाली आहे. सध्या 4 हजार 627 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 59 हजार 496 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 75 हजार 89 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 1402 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1299, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 37, यवतमाळ 47, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.