मे सत्रातील जेईई-मेन परीक्षा पुढे ढकलली
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : येत्या 24 ते 28 मेदरम्यान होणारी जेईई - मेन परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय चाचणी संस्थेने ( एनटीए ) आज दिली . गेल्या एप्रिल सत्रातील जेईई -मे न परीक्षा यापूर्वीच पुढे ढकलली गेली होती . एप्रिल आणि मे सत्रातील जेईई परीक्षेचे नवे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल , असे एनटीएने सांगितले आहे . विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी एनटीएच्या अधिकृत वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यावी , असे आवाहन पेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी ट्विटरवरून केले आहे . जेईई मेन परीक्षा यंदापासून दरवर्षी चार वेळा घेण्यात येणार आहे . फेब्रुवारी आणि मार्च सत्रातील परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या .