नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
चंद्रपूर : जिल्हयात दोन दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने शेतक-यांच्या शेतपिकाचे, नागरिकांच्या घरांचे, दुकानांचे, अन्नधान्य आदिंचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन आपदग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्हयात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो घरांची पडझड झाली. तर हजारो हेक्टरवरील पीके पुराच्या पाण्याखाली आली. पंधरा पैकी ९ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असुन जिल्ह्यातत एकुण ९०४० मीमी पावसाची नोंद झाली आहे. बल्लारपूर शहरात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यु झाला. ऐतिहासिक किल्याचा काही भाग खचला, विसापुर गावात भिंत कोसळून एक महिला जखमी झाली. जिवती तालुक्यात अनेक गावांमध्ये सोयाबिन पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तेलंगाणातील पुराचा महाराष्ट्रातील पिकांना फटका बसला.
जिल्हयात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेला मोठया प्रमाणावर फटका बसला असुन जिल्हा प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करावे आणि नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. जिल्हयातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रक्रियेत नुकसानग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत त्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे असे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले आहे.