मुंबईत २००० हून जास्त लोकांची बनावट लसीकरण शिबिरांद्वारे फसवणूक; ठाकरे सरकारची हायकोर्टात माहिती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबईत बनावट लसीकरण शिबीराच्या माध्यमातीन दोन हजारांपेक्षा अधिक जणांची फसवणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात ही माहिती दिली आहे. करोनाची लस मिळण्यामध्ये लोकांना होणाऱ्या अडचणींसंबंधी दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य सरकारने ही माहिती दिली आहे. दरम्यान यावेळी हायकोर्टाने मुंबई महापालिकेला लसीकरण घोटाळ्यातील पीडितांच्या शरिरात अँटीबॉडीज (प्रतिपिंडे) निर्माण झाल्या आहेत का याची तपासणी करण्यासही सांगितलं आहे.