‘बिग बॉस १५’च्या घरात तेजस्वी प्रकाशने दिली प्रेमाची कबुली
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित शो ‘बिग बॉस’ चा १५ वा सिझन सुरू झाला आहे. यंदाच्या हटके थीममुळे प्रेक्षक शोसाठी खूप आतुर झाले आहेत. शोच्या नियमानुसार ‘बिग बॉस ओटीटि’ मधील स्पर्धक शमिता शेट्टी, निशांत भट्ट, प्रतीक सेजपाल यांना बिग बॉसच्या घराचा वापर करण्याची परवागी आहे .तसंच ते ज्या स्पर्धकांची निवड करतील तेच बिग बॉसच्या घरात राहतील. इतर स्पर्धकांना अंगणात राहायचे आहे, ज्याचे परिवर्तन जंगलात केले आहे. या जंगलवासियांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी म्हणजे कपडे, जेवणासाठी लढावे लागणार आहे. हा शो सुरू होऊन दोन दिवस सुद्धा झाले नाहीत तर घरात भांडणं बघायला मिळाली. कालच्या भागात प्रतीक आणि जय भानुशालीमध्ये खूप मोठे भांडण झाले. तर दुसरीकडे आजच्या भागात बिग बॉसच्या घरात प्रेमाची कबुली होताना दिसत आहे. शोमध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या प्रेमाची कबुली देताना दिसेल.तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
कलर्स वाहिनीने नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात जंगलवासी तेजस्वी प्रकाश बिग बॉसशी गप्पा मारताना दिसत आहे. ती बिग बॉसशी फ्लर्ट करत असून ती बिग बॉसला बेबी या नावाने हाक मारताना दिसत आहे. ती सांगते की, “तुम्ही आता आपल्या प्रेमाची कबुली करुन टाका.. मी अशी राहिली तर ते चांगलं दिसेल का? आणि तुम्हाला ते पटेल का? नाही ना तर कृपया आमचे कपडे आम्हाला पाठवून द्या”. अनेकदा विनंती केल्यावर ती म्हणते ‘जाऊदे तुम्ही काहीच करु शकत नाहीत’.