पंतप्रधान जनधन योजनेच्या खात्यांची संख्या ४२ कोटींवर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान जनधन योजनेच्या खात्यांची संख्या मार्च २०१५ मध्ये १४.७२ कोटी वरून २१ जुलै २०२१ पर्यंत ४२.७६ कोटी झाली आहे. म्हणजे सहा वर्षांत तब्बल तिपटीने वाढ झाली असल्याची माहिती वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) ट्विट करून दिली.
या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पीएम जन धन योजनेच्या खात्यांमध्ये तीन पटीने वाढ झाली. PMJDY खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेने सुरुवातीपासून अनेक पटीने वाढ केली. आर्थिक समावेशक कार्यक्रमाच्या यशाचा हा एक मोठा पुरावा आहे.
काय आहे खात्याची वैशिष्ट्ये आणि फायदे
जन धन खातेधारकांना २.३० लाख रुपयांचा लाभ दिला जातो. खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि ३० हजार रुपयांचा सर्वसाधारण विमा खातेदारांना दिला जातो. जन धन खातेदाराचा अपघात झाल्यास त्याला ३० हजार रुपये दिले जातात. खातेदाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याला दोन लाख रुपये दिले जातात. या संदर्भात जन धन खातेधारकाला २.३० लाख रुपयांपर्यंत मिळू शकते.
याशिवाय ग्राहकांना किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करण्याची गरज नाही. या खात्यात सरकारी ग्राहकांना १० हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील दिली जाते. यासह बचत खात्याइतके व्याजाचा लाभ देखील उपलब्ध आहे. मोबाईल बँकिंगचा लाभही दिला जातो. याशिवाय पैसे काढण्यासाठी आणि खरेदीसाठी रुपे कार्ड उपलब्ध आहे.
प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अधिक खाते उघडले जाते. पण एखाद्याला हवे असल्यास जन धन खाते एका खासगी बँकेतही उघडू शकता. इतर बचत खाते असल्यास ते जन धन खात्यात रूपांतरित करता येते. भारतात राहणारा कोणताही नागरीक, ज्याचे वय १० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे तो जनधन खाते उघडू शकतो. सदर खाते उघडण्यासाठी दस्तऐवज पडताळणी केवायसी अंतर्गत केली जाते. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड या दस्तऐवजांचा वापर करून जन धन खाते उघडता येते.