पँगोंग त्सोच्या किनाऱ्यावर आयटीबीपी जवानांनी फडकवला राष्ट्रध्वज
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली: आज देशात सर्वत्र ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्या दरम्यान लडाखमधील पँगोंग त्सोच्या किनाऱ्यावर भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वज दिमाखात फडकवला. जवानांनी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
जवानांनी स्वातंत्र्यदिन साजरा केल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. हिमालयाच्या पर्वतरांगेत निळ्याशार आकाशासोबत तिरंगा मानाने फडकताना पाहून हा क्षण देशवासियांसाठी मोठा अभिमानास्पद होता.